शेतकरी कर्जमाफी 2026: KYC, OTS, Farmer ID, ITR, PM Kisan, AgriStack आणि सर्व 30 प्रश्नांची सविस्तर माहिती
Shetkari Karjmafi 2026
राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 संदर्भात शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. पहिली यादी, दुसरी यादी, KYC प्रक्रिया, Farmer ID, AgriStack, OTS योजना, Income Tax, PM Kisan, Commercial Bank, Nationalised Bank, Gold Loan, नवीन पीक कर्ज, मृत शेतकऱ्यांचे वारस, Hair Cut Policy अशा अनेक विषयांबाबत सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू आहेत.
याच पार्श्वभूमीवर शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रश्नोत्तरांवर आधारित ही सविस्तर माहिती देत आहोत.
कर्जमाफी योजनेचा उद्देश
या योजनेचा मुख्य उद्देश पात्र थकीत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून त्यांना पुन्हा नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देणे हा आहे. त्याचबरोबर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर लाभ देण्याचा सरकारचा मानस आहे.
Shetkari Karjmafi 2026
प्रश्नोत्तरे – भाग १ (प्रश्न १ ते ५)
1) पहिल्या यादीच्या KYC प्रक्रियेबाबत काही तक्रारी आल्या आहेत का?
उत्तर: होय. बँकांनी दिलेल्या 32 लाख खात्यांपैकी 17 लाख खात्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली. उर्वरित खात्यांमध्ये चुकीचे खाते क्रमांक, KYC त्रुटी, बंद (Dormant) खाती तसेच व्याजाशी संबंधित त्रुटी आढळल्याने माहिती पुन्हा पडताळणीसाठी बँकांकडे पाठविण्यात आली आहे. अशा शेतकऱ्यांची नावे दुसऱ्या यादीत समाविष्ट केली जाऊ शकतात.
2) KYC करण्यासाठी शेतकऱ्यांनी नेमके काय करावे?
उत्तर: यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जावे. तेथे यादीतील क्रमांक किंवा आधार क्रमांक देऊन नाव, बँकेचे नाव आणि 31 मार्च 2025 पर्यंतची मूळ थकबाकी तपासावी. माहिती योग्य असल्यास आधार प्रमाणीकरण करावे. माहिती चुकीची असली तरी KYC करून grievance नोंदवावी.
3) तक्रारी कुठे जातील आणि त्यांचे निवारण कसे होईल?
उत्तर: सर्व तक्रारी जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जिल्हास्तरीय समितीकडे (DLC) जातील. या समितीत CEO ZP, DDR, Lead Bank Manager आणि संबंधित बँकेचे Nodal Officer असतील. समिती माहिती पडताळून आवश्यक दुरुस्ती करेल.
4) पोर्टलवर 31 मार्च 2025 ची रक्कम दिसते, पण आताची रक्कम जास्त आहे. वरचे पैसे भरावे लागतील का?
उत्तर: नाही. राष्ट्रीयकृत, जिल्हा आणि ग्रामीण बँकांनी 1 एप्रिल 2025 नंतर या कर्जांवर व्याज आकारणार नसल्याचे लेखी दिले आहे. त्यामुळे 31 मार्च 2025 पर्यंतची रक्कमच अंतिम मानली जाईल.
5) उर्वरित शेतकऱ्यांची दुसरी यादी कधी येणार?
उत्तर: उर्वरित माहितीची पडताळणी सुरू असून साधारण 15 ऑगस्टपर्यंत दुसरी यादी प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
Shetkari Karjmafi 2026
प्रश्नोत्तरे – भाग २ (प्रश्न ६ ते १०)
6) गावपातळीवर यादी कुठे पाहता येईल?
उत्तर: यादी बँकेच्या शाखा, ग्रामपंचायत आणि विविध कार्यकारी सेवा संस्थांमध्ये उपलब्ध आहे. पात्र शेतकऱ्यांना शासनाकडून SMS देखील पाठवले जात आहेत.
7) Farmer ID दिसत नसेल तर?
उत्तर: पहिल्या 17 लाख लाभार्थ्यांपैकी बहुतांश Farmer ID तयार झाले आहेत. उर्वरित माहिती अपडेट होत आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रयत्न करावा.
8) KYC करताना “No Record Found” येत आहे. काय करावे?
उत्तर: AgriStack क्रमांक तयार झाला नसेल तर हा संदेश दिसू शकतो. अडचण कायम राहिल्यास DDR कार्यालयात ऑफलाइन तक्रार करावी.
9) Grievance कुठे नोंदवावी?
उत्तर: माहिती चुकीची असल्यास KYC करतानाच ऑनलाइन तक्रार करावी. नावच नसेल तर दुसऱ्या यादीची वाट पाहावी. त्यानंतरही नाव न आल्यास तहसीलदार किंवा DDR यांच्याकडे अर्ज करावा.
10) मयत शेतकऱ्यांचे KYC कसे करावे?
उत्तर: वारसांनी बँकेत वारस नोंद करून कर्ज व खाते आपल्या नावावर हस्तांतरित करावे. त्यानंतर आधार लिंक करून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी.
Shetkari Karjmafi 2026
प्रश्नोत्तरे – भाग ३ (प्रश्न ११ ते १५)
11) राष्ट्रीयकृत बँकांच्या शेतकऱ्यांची यादी नंतर लागणार आहे का?
उत्तर: नाही. ती पहिल्या यादीतच समाविष्ट आहे. 17 लाख लाभार्थ्यांपैकी सुमारे 7 लाख जिल्हा बँकांचे तर उर्वरित 10 लाख राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांचे आहेत.
12) दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांसाठी OTS यादी कधी येईल?
उत्तर: प्रथम दोन लाखांपर्यंतच्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून नवीन पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. त्यानंतर OTS संदर्भातील यादी जाहीर केली जाईल.
13) 2022 मध्ये घेतलेले कर्ज माफ होईल का?
उत्तर: पात्र कालावधीत (1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025) मंजूर झालेले कर्जच विचारात घेतले जाईल. त्या अटी पूर्ण करणारे 2022 मधील कर्ज पात्र असू शकते.
14) दोन लाखांवरील कर्जासाठी OTS योजना कशी असेल?
उत्तर: RBI आणि व्यापारी बँकांशी चर्चेनंतर Hair Cut Policy लागू करण्यात आली आहे. NPA झाल्यानंतरचे व्याज माफ केले जाऊ शकते आणि मुदलातही सवलत मिळू शकते. उदाहरणार्थ, ₹5 लाखांचे कर्ज Hair Cut नंतर ₹2.5 लाखांवर आले तर शेतकऱ्याने ₹50,000 भरायचे आणि सरकार ₹2 लाख बँकेत जमा करू शकते. यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत असू शकते.
Shetkari Karjmafi 2026

15) पोर्टलवर फक्त मुद्दल दिसते, व्याजाचे काय?
उत्तर: व्यापारी बँकांच्या NPA खात्यांवरील व्याज Hair Cut Policy नुसार माफ करण्याची प्रक्रिया असल्यामुळे पोर्टलवर मुख्यतः सेटलमेंटची मुद्दल दिसू शकते.
Shetkari Karjmafi 2026
प्रश्नोत्तरे – भाग ४ (प्रश्न १६ ते २०)
१६) नियमित कर्ज भरणारा शेतकरी पात्र आहे का? आणि Gold Loan घेऊन पीक कर्ज भरले असल्यास काय?
उत्तर: नियमित कर्ज भरणारे शेतकरी प्रोत्साहनपर लाभ योजनेसाठी पात्र आहेत. मात्र Gold Loan या योजनेत पूर्णपणे अपात्र आहे. फक्त पीक कर्ज (Crop Loan) असल्यासच लाभ मिळू शकतो.
१७) जुने जिल्हा बँकेचे कर्ज कधी माफ होणार?
उत्तर: २०१९ पूर्वीची कर्जे महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनांमध्ये समाविष्ट होती. या नवीन योजनेत १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या कर्जाचा समावेश नाही.
१८) प्रोत्साहनपर (Incentive) अनुदानाची यादी कधी येणार?
उत्तर: सध्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे. त्यांचे प्रश्न मार्गी लागल्यानंतर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानाची यादी प्रसिद्ध केली जाईल.
१९) वृद्ध किंवा दिव्यांग शेतकरी घराबाहेर पडू शकत नसल्यास KYC साठी बँक घरी येईल का?
उत्तर: सध्या यासाठी स्वतंत्र Timeline जाहीर करण्यात आलेली नाही. मुख्य काम पूर्ण झाल्यानंतर अशा अपवादात्मक प्रकरणांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना विशेष यंत्रणा राबविण्याच्या सूचना दिल्या जातील.
२०) TDS कापला जात असेल, पण ITR भरून तो परत मिळत असेल तर कर्जमाफी मिळेल का?
उत्तर: जर शेतीव्यतिरिक्तचे उत्पन्न संबंधित आर्थिक वर्षात शासनाने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर व्यक्ती अपात्र ठरेल. उत्पन्न मर्यादेत असल्यास लाभ मिळू शकतो.
Shetkari Karjmafi 2026

प्रश्नोत्तरे – भाग ५ (प्रश्न २१ ते २५)
२१) श्रीमंत लोक जे मुद्दाम कर्ज थकवतात, त्यांना ब्लॅकलिस्ट करणार का?
उत्तर: शासनाने आधीच फिल्टर लावून अशा लोकांना यादीतून वगळले आहे. सरकारी नोकर, शिक्षक, प्राप्तिकर भरणारे, साखर कारखाना किंवा दूध संघाचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य अशा अनेक उच्च उत्पन्न गटातील व्यक्तींना योजनेबाहेर ठेवण्यात आले आहे.
२२) एवढा मोठा डेटा कसा गोळा केला आणि किती वेळ लागला?
उत्तर: सहकार विभागाचे सुमारे ८,००० कर्मचारी, ३,००० Auditors आणि MahaIT यांनी रात्रंदिवस काम करून माहिती तयार केली. २ जूनच्या शासन निर्णयानंतर सुमारे १५–२० दिवसांत शेतकऱ्यांचा डेटा तपासून पोर्टलवर अपलोड करण्यात आला.
२३) एका शेतकऱ्याची दोन पीक कर्ज खाती असतील तर दोन्ही माफ होतील का?
उत्तर: दोन्ही कर्जांची एकूण रक्कम ₹२ लाखांच्या आत असेल तर दोन्हींचा लाभ मिळू शकतो. एकूण रक्कम ₹२ लाखांपेक्षा जास्त असल्यास प्रकरण OTS योजनेत जाईल.
२४) कर्ज ‘रिन्यू’ केलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का?
उत्तर: कर्ज Renew केल्यामुळे खाते बँकेच्या नोंदीत थकीत दिसत नसेल तर कर्जमाफी मिळणार नाही. मात्र अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळण्याची शक्यता आहे.
२५) सरकारने ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ देण्याची घोषणा केली होती; मग ३१ लाखांचा आकडा कसा?
उत्तर: योजनेचे दोन भाग आहेत. सुमारे ३२ लाख थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा OTS चा लाभ मिळेल, तर सुमारे २४ लाख नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळेल. दोन्ही मिळून सुमारे ५६ लाख लाभार्थी होतात.
Shetkari Karjmafi 2026
प्रश्नोत्तरे – भाग ६ (प्रश्न २६ ते ३०)
२६) नियमित कर्ज भरणाऱ्या सर्वांना सरसकट प्रोत्साहन रक्कम मिळेल का?
उत्तर: नाही. येथेही प्राप्तिकराचा नियम लागू आहे. ज्यांचे बिगर-शेती उत्पन्न जास्त आहे, त्यांना ₹५० हजारांचा प्रोत्साहनपर लाभ मिळणार नाही. हा लाभ गरजू शेतकऱ्यांसाठी आहे.
२७) गावपातळीवरील Commercial Bank यादीतील रक्कम आणि KYC Portal वरील रक्कम वेगळी दिसत आहे; काय करावे?
उत्तर: Hair Cut नंतरची रक्कम दाखवली गेल्यामुळे फरक दिसू शकतो. शेतकऱ्यांनी पोर्टलवरील ३१ मार्च २०२५ पर्यंतची मूळ रक्कम ग्राह्य धरावी. शंका असल्यास आधार प्रमाणीकरण करून तक्रार नोंदवावी.
२८) मागील वर्षी उत्पन्न जास्त होते म्हणून Income Tax भरला, पण आता नोकरी गेली आहे; लाभ मिळेल का?
उत्तर: नाही. पात्रता संबंधित आर्थिक वर्षातील उत्पन्नावर ठरते. ज्या वर्षात उत्पन्न प्राप्तिकर मर्यादेपेक्षा जास्त असेल त्या आधारावर अपात्रता लागू होईल.
२९) गहाण ठेवलेले कर्ज किंवा पतपेढीचे कर्ज माफ होईल का?
उत्तर: या योजनेत फक्त पात्र पीक कर्जाचा विचार केला जात आहे. गहाण ठेवून घेतलेले इतर मुदत कर्ज (Medium Term Loan) किंवा पतपेढीचे कर्ज या योजनेत माफ होणार नाही.
३०) PM Kisan चे पैसे कर्जात वळते झाल्यामुळे खाते नियमित झाले असेल, तर कर्जमाफी मिळेल का?
उत्तर: नाही. अशा वेळी खाते नियमित मानले जाईल. त्यामुळे कर्जमाफी मिळणार नाही; मात्र प्रोत्साहनपर लाभ मिळू शकतो.
Shetkari Karjmafi 2026
निष्कर्ष
शेतकरी कर्जमाफी २०२६ संदर्भात शासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रश्नोत्तरांमुळे अनेक महत्त्वाच्या शंकांचे निरसन झाले आहे. KYC, Farmer ID, AgriStack, OTS, Hair Cut Policy, PM Kisan, Income Tax, Commercial Bank, Nationalised Bank, Gold Loan, मृत शेतकऱ्यांचे वारस आणि प्रोत्साहनपर लाभ यांसारख्या विषयांबाबत अधिकृत स्पष्टीकरण उपलब्ध झाले आहे.
तथापि, अंतिम पात्रता, लाभार्थी यादी आणि पुढील टप्प्यांतील निर्णय शासनाच्या अधिकृत आदेश (GR), जिल्हास्तरीय पडताळणी आणि बँकांच्या नोंदींवर अवलंबून राहतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीच ग्राह्य धरावी.